Guide Kapil Jain with the students who secured rank in top 1000 in JEE Advanced exam.
Guide Kapil Jain with the students who secured rank in top 1000 in JEE Advanced exam.esakal

JEE Advance 2024 Result: जेईई ॲडव्हान्स्‍डमध्ये नाशिकचे विद्यार्थी चमकले; पहिल्‍या एक हजारांत 5 विद्यार्थ्यांचा समावेश

JEE Advance : राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी घेतलेल्‍या जेईई ॲडव्हान्स्‍‍ड परीक्षेचा निकाल रविवारी (ता. ९) जाहीर झाला.

JEE Advance 2024 Result : इंडियन इस्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी घेतलेल्‍या जेईई ॲडव्हान्स्‍‍ड परीक्षेचा निकाल रविवारी (ता. ९) जाहीर झाला. परीक्षेत नाशिकच्‍या पाच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय क्रमवारीत एक हजारांच्‍या आत क्रमांक पटकावत यशस्‍वी कामगिरी केली आहे. यासोबत इतरही अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविताना आयआयटीमध्ये प्रवेशाचे तिकीट मिळविले आहे. (5 students included in first one thousand in JEE Advanced exam result )

राष्ट्रीय स्‍तरावरील या परीक्षेत दिव्यांश नारखेडे याने २६० वा क्रमांक मिळविला आहे. अनिरुद्ध महापत्रा याने ३२५ वा क्रमांक, तसेच खुशी कुचेरिया ६४२ वा क्रमांक, आयुश गणेश्वर ७१९, मनन गगराणी ९८४ वा क्रमांक मिळविताना राष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या एक हजारांत येण्याचा मान मिळविला आहे. या वर्षी आयआयटी मद्रास या संस्‍थेतर्फे जेईई ॲडव्हान्स्‍ड या परीक्षेचे आयोजन केले होते.

जेईई मेन्‍स या परीक्षेतून पात्रता मिळविलेल्‍या विद्यार्थ्यांसाठी जेईई ॲडव्हान्स्‍‍ड ही परीक्षा आयोजित केली होती. गेल्‍या २६ मेस जेईई ॲडव्हान्स्‍‍ड ही परीक्षा घेतली होती. या परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे २३ आयआयटी संस्थांमधील सतरा हजारांहून अधिक जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. दरम्‍यान, या परीक्षेला देशभरातून एक लाख ९१ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. नाशिकच्‍या केंद्रांवरून दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. (latest marathi news)

Guide Kapil Jain with the students who secured rank in top 1000 in JEE Advanced exam.
JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

स्पेक्ट्रमचे चौघांचा हजाराच्‍या आत क्रमांक

परीक्षेत ‘स्‍पेक्‍ट्रम गेट वे टू सक्‍सेस’ या क्‍लासच्‍या विद्यार्थ्यांनी यशस्‍वी कामगिरी केली आहे. क्‍लासचे ८० पेक्षा जास्‍त विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. खुशी कुचेरिया हिने राष्ट्रीय क्रमवारीत ६४२ वा क्रमांक पटकावला आहे. दिव्‍यांश नारखेडे याने २६० वा क्रमांक मिळविला.

तसेच आयुश गजेश्‍वर ७१९, मनन गगराणी ९८४, कलश लुंकड (११२१), मंथन कोठावदे (१४४१), अंकित साहा (१५२३), क्रिष्णा कुकरेजा (२०८४), भाग्‍येश कोथालकर (२१७५), सोहम दुसाने (२६१८) यांनी यशस्‍वी कामगिरी केली आहे. पहिल्‍या एक हजारांत येण्याचा बहुमान क्‍लासच्‍या चार विद्यार्थी मिळाला आहे. सर्व यशस्‍वी विद्यार्थ्यांना स्‍पेक्‍ट्रमचे संस्‍थापक संचालक कपिल जैन यांचे मार्गदर्शन लाभले.

रेजोनन्‍सच्‍या विद्यार्थ्यांची सातत्‍यपूर्ण कामगिरी

रेजोनन्स, नाशिक केंद्रातील विद्यार्थ्यांनी सातत्‍यपूर्ण कामगिरी केली आहे. यामध्ये अनिरुद्ध महापत्रा याने ३२५ वा क्रमांक पटकावला. तर स्मीरा पंडा (१४८४), मंदार देशमुख (२७९), सोहम डोखळे (६६५), प्रथम थोरात (१८७४), प्रणव पवार (२०९१), ऋषिकेश मुसळे (२६४९), प्रथमेश महाजन (२७४८), आयुष वनमाळी (२९३७), सिद्धी बोरसे (२९८८) यांच्‍यासह इतर विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. विद्यार्थ्यांना स्वप्नील जैन, मनीष शंकर, शिवाजी भोसले व त्यांच्‍या टीमचे मार्गदर्शन लाभले.

Guide Kapil Jain with the students who secured rank in top 1000 in JEE Advanced exam.
JEE Advanced 2023 Result : जेईई ॲडव्हान्स परीक्षेत व्ही. सी. रेड्डी पहिला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com