
नाशिक : वाढता ताणतणाव आणि आर्थिक कारणांमुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेले जीवन संपविण्याचा मार्ग अवलंबतात तर, वाढत्या ताणतणावासह चुकीची जीवनशैली व जंक फूड यांमुळे शारीरिक व्याधींमुळे हृदयविकारासह अन्य जीवघेण्या आजारांमुळे कमी वयोमानात मनुष्य मृत्यूच्या घशात जात असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. सन २०२४ मधील अकस्मात मृत्यूच्या आकडेवारीनुसार दररोज किमान ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील गंभीर बाब म्हणजे ३९४ जणांच्या आत्महत्या आहेत.