
लासलगाव : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हंगामातील नविन सोयाबीन व मक्याची आवक सुरू झाली असल्याची माहिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली. मुहूर्तावर पाटोदा (ता. येवला) येथील शेतकरी सतीश कचरू ठोंबरे यांप्या सोयाबीनला पाच हजार प्रति क्विंटल या दराने श्लोक मार्केटींग इंडिया यांनी खरेदी केला. रायपूर येथील शेतकरी नामदेव बाबुराव कोल्हे यांचा मका २७११ रूपये प्रति क्विंटल दराने मे. भागीनाथ भिकाजी गांगुर्डे यांनी खरेदी केला. (5 thousand rate at time of purchase of soybeans)