Nashik Onion: कांद्याची 700 कोटींची उलाढाल ठप्प! जिल्ह्यात 20 दिवसानंतरही बाजार समित्यांतील लिलाव बंदच, सरकार निवडणुकीत व्यस्त

Nashik News : जिल्ह्यातील १५ बाजार समित्या, त्यांच्या उपबाजारातून होणारी कांदा खरेदी-विक्री व यातून निर्माण होणारा रोजगार पाहता जवळपास ७०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
Onion
Onionesakal

मालेगाव : कसमादेसह जिल्ह्यातील कांदा बाजार गेल्या वीस दिवसापासून बंद आहेत. विविध सण-उत्सव, मार्च एंड तसेच हमाल मापारी यांच्या प्रश्‍नांमुळे बाजारातील उलाढालीला ब्रेक लागला आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत कांदा असूनही शेतकऱ्यांना तो विकता येत नाही. कांदा विक्रीसाठी ने-आण करणाऱ्या ट्रॅक्टर, पिकअप आदी वाहनांनाही रोजगार नाही.

बाजार बंद असल्याने उन्हाळी कांदा काढणीचे कामही रेंगाळले आहे. या प्रक्रियेतील शेतमजूर बेरोजगार झाले आहेत. एकूणच जिल्ह्यातील १५ बाजार समित्या, त्यांच्या उपबाजारातून होणारी कांदा खरेदी-विक्री व यातून निर्माण होणारा रोजगार पाहता जवळपास ७०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. (Nashik 700 crore turnover onion stopped after 20 days market committees closed)

जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंत व उमराणे या बाजार समित्यांमध्ये कांद्याची सर्वाधिक उलाढाल होते. रोज सरासरी १५ ते २० हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी येतो. उर्वरित बाजार समित्या व त्यांच्या उपबाजारात रोज सरासरी ७ ते १० हजार क्विंटल कांद्याची खरेदी-विक्री होते.

साधारणतः: जिल्ह्यात दिवसाकाठी दीड लाख क्विंटलपेक्षा अधिक कांदा विविध बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येतो. २० दिवसात ३० ते ३५ लाख क्विंटल कांद्याची खरेदी-विक्री थांबली. चांगल्या वातावरणामुळे उन्हाळी कांद्याचे पीक जोमात आहे. सध्या बाजारात येत असलेल्या कांद्याला १५०० ते २ हजारा दरम्यान भाव मिळाला असता.

उच्च प्रतिचा कांदा दोन हजारावर विकला गेला असता. शिवाय हजारो वाहनांचा बुडालेला रोजगार, डिझेल विक्रीतील घट, मजुरांच्या हाताला नसलेले काम, बाजार समित्या व कांदा विक्री केंद्राबाहेरील व्यावसायिकांना बसलेला फटका हे सर्व पाहता किमान ७०० कोटी रुपयांची उलाढाल मंदावल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

२९ मार्चला गुडफ्रायडे, ३० व ३१ मार्चला शनिवार, रविवार नियमित सुटी, १ ते ४ एप्रिल या कालावधीत व्यापाऱ्यांच्या मार्चएंडच्या हिशोबामुळे लिलाव बंद होते. ५ एप्रिलपासून हमाल, मापारी व व्यापारी यांच्यातील प्रश्‍नांमुळे लिलाव बंद आहेत. या प्रश्‍नावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.  (latest marathi news)

Onion
Nashik Onion News : शेतकरी हितासाठीच खासगी खरेदी; कुबेर जाधवांनी शासनाला ठणकावले

तो निघण्यासाठी कोणीही ठोस भूमिका घेऊन पुढे येत नाही. कसमादेसह जिल्ह्यात गेल्या वर्षापेक्षा १५ ते २० टक्क्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड कमी झाली. असे असले तरी चांगल्या वातावरणामुळे उत्पन्नात वाढ झाली. दुष्काळी परिस्थिती असली तरी गेल्या वर्षाएवढेच उन्हाळी कांद्याचे उत्पन्न आले आहे. बाजार बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत राखून ठेवला आहे. तापमान ४३ ते ४४ अंशा दरम्यान असल्याने कांदा खराब होण्याची भीती आहे.

सध्या सण-उत्सव व लग्नसोहळ्यांचा हंगाम सुरु आहे. कांदा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना कौटुंबिक खर्चासाठी देखील आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कांदा लिलाव पुर्ववत होण्यासाठी कुठल्याही हालचाली होत नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत.

नाशिक, धुळे व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारात हा मुद्दा अग्रभागी राहू शकेल आणि कांदा उत्पादकांच्या भावनांचे प्रतिबिंब निवडणुकीत नक्कीच दिसेल. मात्र या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला ना राजकारण्यांना वेळ आहे ना उमेदवारांनाही...

"गेल्या २० दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमधील कांदा लिलाव ठप्प आहेत. शिवारात पोळ घालून ठेवलेला कांदा अति तापमानामुळे खराब होत आहे. आचारसंहितेच्या नावाने प्रशासन हस्तक्षेप करण्यास तयार नाही. शेतकऱ्यांना व्यापारी व हमाल मापारी यांच्या वादाशी काही देणे घेणे नाही. कुठलीही कपात न करता शेतकऱ्यांना रोखीने पेमेंट अदा केले पाहिजे. राजकीय नेते व लोकप्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत व्यस्त आहेत. सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. शेतकऱ्यांचा अंत न पाहता प्रशासन व लोकप्रतिनिधींनी कांदा बाजार सुरु होण्यासाठी तातडीने पावले उचलावीत."

- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक.

Onion
Nashik Onion Auction : अवघ्या 5 बाजार समित्यांमध्येच लिलाव; चौकशी समित्यांचा बडगा उगारूनही व्यापारी भूमिकेवर ठाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com