Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या योजनेचे 71 हजार खाते; मालेगावी नववर्षात जोरदार प्रतिसाद

Sukanya Samriddhi Yojana : केंद्र सरकारने ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या अभियानांतर्गत २२ जानेवारी २०१५ मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरु केली.
Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana Sakal

Sukanya Samriddhi Yojana : केंद्र सरकारने ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या अभियानांतर्गत २२ जानेवारी २०१५ मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरु केली. ही योजना मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी फलदायी ठरत आहे. या योजनेत मालेगाव डाक विभागांतर्गत नऊ वर्षात ७१ हजार १७२ खाते उघडून मुलींच्या शिक्षणाचे व लग्नासाठी लागणारी रक्कम राखीव करून ठेवली आहे. केंद्र व राज्य सरकारतर्फे मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. (nashik 71 thousand account of Sukanya samriddhi Yojana in malegaon marathi news)

राज्य सरकारने मुलींसाठी लेक लाडकी योजना सुरु केली आहे. बेटी बचाव बेटी पढाव, मनोधैर्य योजना या सह विविध योजना राबविल्या जात आहेत. यात बेटी बचाव बेटी पढाव या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुकन्या समृद्धी योजनेचा २०१५ मध्ये शुभारंभ केला. देशभरात या योजनेला मोठ्या प्रमाणात नागरीकांनी प्रतिसाद देत डाकघर, राष्ट्रीयकृत बँकेत खाते खोलून सुकन्या योजनेमध्ये पैशांची गुंतवणूक केली.

मालेगाव डाकघर अंतर्गत मालेगाव, सटाणा, देवळा, कळवण, नांदगाव, चांदवड, येवला, निफाड, लासलगाव या नऊ तालुक्यात नऊ वर्षामध्ये सुकन्या समृद्धी योजनेत ७१ हजार १७२ खाते खोलण्यात नागरीकांनी खाते खोलले आहे. यात मालेगाव डाकघर अंतर्गत येणाऱ्या सहा पोष्ट ऑफिसमध्ये ९ हजार २१३ नागरीकांनी सुकन्येचे खाते खोलले आहे.  (latest marathi news)

Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफमध्ये अकाउंट असणाऱ्यांनी 31 मार्चआधी करा ही कामे...

अशी आहे सुकन्या योजना

डाकघर विभागात मुलीच्या शून्य वयापासून ते दहा वर्षापर्यंत हे खाते उघडले जाते. खाते उघडताना वडीलांचे आधार कार्ड, पॅन कार्ड व मुलीचा जन्म दाखला तसेच आधार कार्ड असेल तर फोटो द्यावा लागतो. या योजनेसाठी ८.०२ टक्के चक्रवाढ व्याजदर दिला जातो. वर्षाला २५० ते दीड लाखापर्यंत रक्कम जमा करता येते. खाते उघडल्यानंतर १५ वर्षापर्यंत हप्ता भरावा लागतो. मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर त्यातील अर्धे पैसे शिक्षणासाठी काढता येऊ शकतात. उरलेली बाकी रक्कम मुलीच्या लग्नाच्यावेळेस किंवा लग्न झाल्यानंतर काढता येऊ शकतात.

''सुकन्या समृद्धी योजनेसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. पोस्ट खात्यांवर दिवसेंदिवस नागरिकांचा विश्‍वास वाढत असल्याने या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ही योजना गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट ऑफिसतर्फे विशेष मोहीम राबविण्यात आल्या आहेत.''- भरत पगार, अधीक्षक, डाकघर मालेगाव

Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीचे आहेत अनेक फायदे; मुलीच्या जन्मानंतर तात्काळ करा सुरु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com