
सिन्नर : परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे डोळ्यादेखत नुकसान झाले. सुमारे ७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी दिली. यामध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले असून, भाजीपाला पिकांचे किरकोळ नुकसान झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. (77 hectares affected by return rains Preliminary report of Sinnar Agriculture Department )