Nashik News: गोदाच्या उजव्या तीरावर 8 किलोमीटर मलवाहिका! ‘नमामि गोदा’ प्रकल्पांतर्गत पर्यटनस्थळांचा विकास

Nashik News : सोमेश्वर येथे रोप-वे तर हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान ते कुसुमाग्रज उद्यान दरम्यान नदीपात्रात बोटदेखील चालविली जाणार आहे.
Ramtirtha
Ramtirthaesakal

नाशिक : गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी वाराणसी येथील ‘नमामि गंगेच्या’ धर्तीवर राबविण्यात येणाऱ्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पात रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट अंतर्गत अस्तित्वात असलेल्या मलनिस्सारण केंद्रांची क्षमता वाढविण्याबरोबरच गोदावरीच्या उजव्या बाजूला चाळीस वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या मलवाहिकांना समांतर वितरण वाहिन्या टाकल्या जाणार आहे. त्याचबरोबर सोमेश्वर येथे रोप-वे तर हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान ते कुसुमाग्रज उद्यान दरम्यान नदीपात्रात बोटदेखील चालविली जाणार आहे. (Nashik Development Namami Goda project marathi news)

२०२७-२८ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘नमामि गंगे’च्या धरतीवर ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविला जाणार आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता देताना १८०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

त्याचबरोबर महापालिकेला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत शहरातील मलनिस्सारण केंद्रांची क्षमता वाढ व आधुनिकीकरण तसेच मलजलवाहिन्यांचे जाळे विकसित करण्यासाठी ५३० कोटी रुपये खर्चाचा स्वतंत्र प्रस्तावदेखील महापालिकेने शासनाला सादर केला आहे.

दरम्यान, सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अलमोंडस ग्लोबल सिक्युरिटीज कंपनीने रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचा बेस मॅप तयार केला. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीसमोर नुकतेच सादरीकरण केले. त्यात जवळपास ५७ कोटींच्या बांधकाम विषयक कामांचे सादरीकरण करताना शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यात मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

खर्चाबरोबरच वेळेची बचत

मलनिस्सारण केंद्रासाठी नवीन जागा शोधणे व अन्य तांत्रिक बाबींचा पुरवठा करण्याऐवजी अस्तित्वातील मलनिस्सारण केंद्रांची क्षमता वाढ केल्यास खर्चाबरोबरच वेळेची बचत होणार असल्याचे सुचविण्यात आले. टाकळी व तपोवन येथील मलनिस्सारण केंद्रात जुने तंत्रज्ञानानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. याच केंद्रांची क्षमता वाढ करण्याचे बांधकाम विभागाकडून सुचविण्यात आले.

बैठकीला शहर अभियंता शिवकुमार वंजारी, मलनिस्सारण विभागाचे अधिक्षक संजय अग्रवाल, नगर नियोजन विभागाचे संचालक, हर्षल बाविस्कर, यांत्रिकी विभागाचे अध्यक्ष अभियंता अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, जितेंद्र पाटोळे, सचिन जाधव, राजेश शिंदे, रवींद्र धारणकर, प्रभारी प्रकाश निकम, नितीन पाटील, बाजीराव माळी, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल गायकवाड उपस्थित होते. (Latest Marathi News)

Ramtirtha
NMC News : निष्कर्ष न काढताच चौकशी समिती गुंडाळली? जाहिरात फलक घोटाळ्याचा संशय वाढला

चाळीस वर्षाहून अधिक कालावधी

गोदावरीच्या उजव्या तीरावर १९९२ मध्ये मलवाहिका टाकल्या आहेत. मलावाहिका टाकताना दोन पाइप एकमेकांना जोडण्यासाठी रिंग टाकली आहे. त्या पाईपलाईनची क्षमता तीस वर्ष आहे. मात्र चाळीस वर्षाहून अधिक कालावधी उलटल्याने त्यातून मलजल वाहून गोदावरी नदीपात्रात मिसळते. त्यामुळे रामवाडी पूल ते टाळकोटेश्वर पुलापर्यंत आठ किलोमीटर समांतर मलवाहिका टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोमेश्वर घाटाची पुनर्बांधणी

‘नमामि गोदा’ प्रकल्पांतर्गत नवशा गणपती येथे घाट विकसित करणे, पार्किंग सुविधा तसेच पर्यटकांना बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर सोमेश्वर येथे घाटाची पुनर्बांधणी करून येथे खेळण्यासाठी जागा विकसित केली जाणार आहे.

सोमेश्वर धबधबा येथे आधुनिक पद्धतीचे रेलिंग तसेच दगडांमध्येच पर्यटकांना बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. धबधबा ते सोमेश्वर मंदिर या दरम्यान रोप-वे बसविण्याचे प्रस्तावित आहे.

ठाकरे उद्यानाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नदी पलीकडे कुसुमाग्रज उद्यान असल्याने येथे पोचण्यासाठी पर्यटकांसाठी बोट चालविली जाणार आहे. तपोवनात लक्ष्मण झुला येथे नवीन पूल बांधण्याबरोबरच लेझर शोचेदेखील नियोजन आहे.

Ramtirtha
NMC News : मराठी पाट्यांचा गोंधळ कायम! कामगार आयुक्त- महापालिकेत अधिकारावरून टोलवाटोलवी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com