
Assembly Election : दीड महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक प्रारूप मतदारयादी मंगळवारी (ता. ६) जिल्हा निवडणूक विभागाने जाहीर केली. जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघात ४८ लाख ७८ हजार मतदारांचा समावेश असलेल्या या यादीत १७ ते १९ या वयोगटांतील तब्बल ८४ हजार नवमतदारांचा समावेश आहे. प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर शनिवार (ता. १०), रविवार (ता. ११), शनिवार (ता. १७), रविवार (ता. १८) रोजी नावनोंदणीसाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. (84 thousand new voters in district of draft electoral list of Legislative Assembly )