Nashik News : मालेगावात 9 व्यापारी गाळे सील! मनपा करवसुली विभागातर्फे कारवाई

Nashik : महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर वसुल करतानाच पाणीपट्टी व संकीर्ण कर वसुलीकडेही लक्ष केंद्रित केले आहे
Officials and employees of Municipal Corporation while sealing the canals in Somwar Bazar Trade Complex
Officials and employees of Municipal Corporation while sealing the canals in Somwar Bazar Trade Complexesakal

मालेगाव : महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर वसुल करतानाच पाणीपट्टी व संकीर्ण कर वसुलीकडेही लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील सोमवार बाजार व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी नऊ गाळे सील करण्यात आले आहेत. (Nashik Malegaon municipal tax collection department marathi news)

आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांच्या आदेशाने वसुली मोहीम सुरु आहे. कर संकलन अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार बाजार येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या सोमवार बाजार व्यापारी संकुलातील ४० गाळेधारकापैकी ९ शॉपिंग गाळेधारक यांच्याकडील गाळा भाडे थकबाकी पोटी २१ लाख ३३ हजार ९५८ रुपये मागील व चालू लायसन्स भाड्याची थकबाकी होती.

यामुळे हे ९ शॉपिंग गाळे सिलबंद करण्यात आले. उर्वरित ३१ गाळेधारकांनी भाडे, लायसन्स फी अदा करण्यासाठी दोन दिवसाची मुदत मागितल्यानंतर त्यांच्यावरील कार्यवाही सद्य स्थितीत स्थगित करण्यात आली. जप्ती पथकप्रमुख शेखर वैद्य, संकीर्ण कर वसुली अधीक्षक रमाकांत धामणे, वरिष्ठ लिपिक मनीष ढिलोर, जयवंत पाटील, इम्तियाज अहमद, लिपिक केशव गंगावणे, भूषण गुरव, चेतन बच्छाव आदींनी ही कारवाई केली.

महानगरपालिका क्षेत्रातील मनपा मालकीच्या सर्व गाळेधारकांनी शॉपिंग व हॉकर्स लायसन्स शुल्क संकीर्ण करवसुली विभागाकडे थकबाकी रक्कमेचा भरणा त्वरित करावा. मनपास सहकार्य करावे अन्यथा शॉपिंग, हॉकर्स गाळे सील बंद करण्याची कारवाई करण्यात येईल असे श्री. जाधव यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Officials and employees of Municipal Corporation while sealing the canals in Somwar Bazar Trade Complex
Nashik Water Crisis: किकवारी परिसरात विहिरींनी गाठला तळ! पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू

आणखी तीन गाळे सील

घरपट्टी वसुली विभागाने घरपट्टी थकबाकी असल्याने कॅम्प-संगमेश्‍वर प्रभागातील सोयगाव वार्डातील डिके कॉर्नरजवळील सन्मती कॉम्प्लेक्समधील तळमजल्याचे तीन गाळ्यांना सील ठोकले. गाळेधारकांना वारंवार सूचना देऊनही घरपट्टी थकीत असल्याने गाळे सीलबंद करण्यात आले.

आयुक्त रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती अधिकारी तथा प्रभाग अधिकारी बळवंत बाविस्कर, सहाय्यक जप्ती अधिकारी प्रवीण पवार, वरिष्ठ लिपिक जनार्दन खैरणार, लिपिक नीलेश देवरे, अनिल साताळे, बापू शिरसाट, राजेश बच्छाव, भूषण केदारे, प्रदीप बच्छाव, मोहन बागुल, संतोष बच्छाव, धवळू गवळी, दादा बच्छाव, अजय माळी, संदीप पवार आदींनी ही कारवाई केली.

शहरातील सर्व खासगी व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी घरपट्टी व थकबाकी रक्कमेचा भरणा करावा अन्यथा प्रशासनातर्फे जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा श्री. जाधव यांनी दिला आहे.

Officials and employees of Municipal Corporation while sealing the canals in Somwar Bazar Trade Complex
Child Care: मुलांच्या विश्वाला समजताना संवादाची हवी किनार; चुका समजून सुधारण्याची संधी देणे महत्त्वाचे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com