
नाशिक : महापालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करताना नियोजित प्रकल्पांना कात्री लागणार असून उत्पन्नातही घट होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रकल्पांना कात्री लागणार असल्याने निधीदेखील अन्य विभागांकडे वळविण्याची तयारी सुरू झाली आहे. बांधकाम विभागाकडून पुन्हा एकदा निधीवर डल्ला मारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रशासकीय कारकिर्दीत दोन अंदाजपत्रक तयार करण्यात आले.