

नाशिक : राज्य सरकारच्या महाआयटीकडून किट मिळाले आहेत; परंतु आता महिला आणि बालकल्याण विभागाकडून रिअलटेल या खासगी कंपनीला ते किट द्यावे, असा दवाब टाकला जात असून, त्याला जिल्ह्यातील सर्व ८७ आधार केंद्रचालकांनी विरोध केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली आधार केंद्र आणि किटचे वाटप करण्यात आले. महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्र अशा सरकारी काम करणाऱ्या केंद्रचालकांना महाआयटीकडून हे किट जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच देण्यात आले.