
देवळाली कॅम्प : भगूर नगरपालिकेने जलवाहिनी दुरुस्तीसाठी रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात दुचाकीस्वार पडून झालेल्या दुर्घटनेत अमित रामदास गाढवे (वय ४२) यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी (ता.२४) सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेनंतर पालिका प्रशासनाच्या कारभाराबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. (Bike rider dies in pothole dug by Bhagur Municipality)