Latest Marathi News | नाशिक : 4 महिन्यापूर्वी झालेला रस्ता खचल्याने अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road accidents

नाशिक : 4 महिन्यापूर्वी झालेला रस्ता खचल्याने अपघात

जुने नाशिक : चार महिन्यापूर्वी काँक्रिटचा तयार केलेला रस्ता खचून ट्रकचा अपघात घडला. ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे खचलेल्या भागात जाऊन फसला. परिसरातील नागरिकाची तसेच विद्यार्थ्यांची येथून नेहमी ये जा सुरू असते. अपघात घडला त्या वेळी सुदैवाने याठिकाणी कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टाळली.


महापालिका ठेकेदारामार्फत याठिकाणी सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी रस्ता खोदून काँक्रिटीकरणाचा नवीन रस्ता तयार करण्यात आला होता. ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार केल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांकडून केल्या जात होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी सोमवारी (ता. १२) परिसरातील नागरिकांची भीती खरी ठरली. येथील बेकरीचा माल भरून आलेला ट्रक या रस्त्यावरून जाताना अचानक रस्ता खचून मोठे भगदाड पडले. त्यात ट्रकचा पुढील भाग टायरसह अडकून पडला. भगदाड मोठे असल्याने त्यातून ट्रक बाहेर पडणे शक्य नव्हते.

हेही वाचा: नाशिक : अल्पवयीन प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर डॉक्टरकडून बलात्कार

ट्रक काढण्यासाठी क्रेन मागवावा लागला. अथक प्रयत्नानंतर ट्रक बाहेर काढण्यात आला. ट्रकचालक किंवा अन्य कुणास कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचा येण्या- जाण्याचा मार्ग हाच असल्याने नेहमी वर्दळ असते. इतकेच नाही तर शाळा सुटण्याच्या काही वेळ अगोदर घटना घडली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अशाप्रकारे नेहमी बेकरीचा माल घेऊन मोठे- मोठे ट्रक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे रहिवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. रस्त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली.

''चार महिन्यापूर्वी रस्त्याचे काम होऊनदेखील अशाप्रकारे रस्ता खचून अपघात घडणे दुर्दैवाची बाब आहे. ठेकेदाराकडून करण्यात आलेले काम निकृष्ट प्रतीचे असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.'' - कैफ कुरेशी, रहिवासी

हेही वाचा: वेठबिगारीत मुलीचा बळी; मेंढ्या चारण्यासाठी नेऊन मारहाण''अशाप्रकारे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. जेणेकरून असे प्रकार घडणार नाही.'' - मोहसीन पठाण, रहिवासी

Web Title: Nashik Accident Due To 4 Months Ago Constructed Road Collapse

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..