Nashik Accident News : ट्रकने दुचाकीस्वार युवकाला चिरडले! पेठरोडवरील घटना

Nashik News : पेठरोडवरील एस.टी. परिवहन महामंडळाच्या वर्कशॉपसमोर भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
Nashik Accident News
Nashik Accident Newsesakal

Nashik News : पेठरोडवरील एस.टी. परिवहन महामंडळाच्या वर्कशॉपसमोर भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात दुचाकीस्वार युवक ट्रकच्या चाकाखाली सापडून चिरडला गेल्याने जागीच ठार झाला. सदरचा अपघात सोमवारी (ता. १७) रात्री घडला होता. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (truck crushed two wheeler youth incident at Peth Road)

विवेक लहानू पवार (२१, रा. गोकुळ सोसायटी, गोरक्षनगर, म्हसरुळ) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वार युवकाचे नाव आहे. लहानू विठोबा पवार यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा विवेक हा टीव्हीएस व्हिक्टर दुचाकीवरून (एमएच १५ बीसी ५१७२) पेठरोडने राहु हॉटेलकडे जात होता. मेहेरधामच्या पुढे गेल्यानंतर एस.डी. महामंडळाचे वर्कशॉप आहे.

सोमवारी (ता. १७) रात्री सव्वा अकराच्या सुमारास भरधाव वेगाने पाठीमागून आलेल्या ट्रकने (एचआर ७४ बी ३६२०) दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ट्रकने दुचाकीस्वार युवक विवेक यास चिरडले. ट्रकचे चाकच विवेकच्या डोक्यावरून गेले होते. (latest marathi news)

Nashik Accident News
Nashik News : पंतप्रधानांनी गुड गव्हर्नन्सची सुरवात ‘नाफेड’पासून करावी : बापूराव पिंगळे

यात भीषण अपघातामध्ये विवेक जागीच ठार झाला. तर अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रक सोडून पोबारा केला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरोधात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेल्मेट असते तर...

दुचाकीस्वार विवेक याचा या अपघातामध्ये ट्रकचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा मृत्यु झाला. विवेकच्या डोक्यात हेल्मेट असते तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता. हेल्मेट वापरासंदर्भात पोलीस आयुक्तालयाकडून वारंवार आवाहन केले जाते. वेळप्रसंगी दंडात्मक कारवाईची मोहीमही राबविली जाते. परंतु तरीही दुचाकीस्वार हेल्मेट वापराकडे दूर्लक्ष करतात.

Nashik Accident News
Nashik District Bank : जिल्हा बॅंकेला शासनाकडून ‘आर्थिक टेकू’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com