Nashik Accident News: दर्गाच्या दर्शनासाठी जाणारा कारच्या धडकेत एक ठार

Nashik Accident : मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव येथील साईकृपा टेक्सस्टाईलसमोर भरधाव वेगातील कारने दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला.
Accident News
Accident Newssakal

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव येथील साईकृपा टेक्सस्टाईलसमोर भरधाव वेगातील कारने दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला. नासिर रहिमुल्ला खान (४२, रा. गौतमनगर, सोनापूर रोड, मुंबई) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मुंबईवरून ते चाळीसगाव येथे दर्गाच्या दर्शनासाठी जात असताना रविवारी (ता.९) रात्री सदरची घटना घडली. ()

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक आबताफ तालीबअली शेख (रा. संतोषनगर, मुंब्रा, ठाणे) यांच्यासोबत रविवारी (ता.९) रात्री नासीर खान हे चाळीसगाव येथील दर्गाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या झायलो कारने निघाले होते. रात्री पाऊणच्या सुमारास नासिर यांनी लघुशंकेसाठी शेख यांना कार रस्त्याच्या कडेला घेण्यास सांगितले.

Accident News
Nashik Accident : शुभम- सुभाषच्या निधनाने कुटुंबाचा आधारवडच हरपला!

त्यानुसार मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगा शिवारातील साईकृपा होलसेल टेक्सस्टाईल मार्केटजवळ कार रस्त्याच्या कडेला घेतली. नासिर खान हे लघुशंका करून त्यांच्या कारजवळ आले असता, त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पांढर्या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, यात नासीर खान हे सुमारे १० ते १२ फुट लांब फेकल्या गेले.

या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला, छातीला, हाता-पायांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र पहाटे सव्वा दोनच्या सुमारास वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident News
Nashik Accident News : देशमानेजवळ लक्झरी- ट्रक अपघातात बसचा चालक ठार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com