

नाशिक : आपल्या साथीदारासोबत मिळून स्वतःच्याच भावाच्या घरी बहिणीने चोरी केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. २४ नोव्हेंबरला झालेल्या या चोरीच्या घटनेची नोंद म्हसरुळ पोलिस ठाण्यात झालेली होती. याप्रकरणातील संशयित महिलेसह तिच्या साथीदाराला गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने अटक करत व सोने विक्रीतील रोकड संशयितांकडून हस्तगत केली आहे.