
Nashik Assembly Election : लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा महायुतीला मिळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जिथे भाजपचे आमदार आहेत, त्या जागा भाजपकडूनच लढविल्या जातील, अशी माहिती केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रविवारी (ता. १) येथे दिली. तपोवनातील आठवण लॉन्समध्ये रविवारी सायंकाळी पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. (According to Union Minister of State for Sports Youth Welfare Raksha Khadse only BJP will contest MLA seats )