

नाशिक : आगामी सिंहस्थापूर्वी गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करावी, त्याचबरोबरच नदीकाठच्या गावांच्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सविस्तर कृती आराखडा तयार करावा. गोदावरीत नागरिकांकडून घाण टाकली जाऊ नये यासाठी नदीकिनारी सायकल ट्रॅक तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गोदावरी व उपनद्या प्रदूषणमुक्तीसाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक शुक्रवारी (ता. ६) झाली.