
जुने नाशिक : भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून विनापरवानगी फटाका विक्री दुकानावर कारवाई करण्यात आली. विविध प्रकारच्या सुमारे ११ हजार ७८३ रुपयांचा ज्वालाग्रही फटाक्यांचा साठा जप्त केला. भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. आयुक्तालयातील विनापरवानगी फटाके विक्रेत्यावर कारवाई करण्याची यंदाची पहिलीच कारवाई आहे. दीपावलीनिमित्त अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांकडून विनापरवानगी ज्वालाग्रही फटाके विक्री केले जातात. (Action taken against unlicensed firecracker shop worth 11 thousand seized by police )