NMC on Unauthorized Hoarding : एसटी महामंडळाकडून होर्डिंग उतरविण्याची कार्यवाही

Unauthorized Hoarding : मुंबई नाका व पंचवटी पोलिसांना पाठविण्यात आल्यानंतर परिवहन महामंडळाकडून होर्डिंग उतरविण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली.
Workers removing hoardings from Old Central Bus Stand area.
Workers removing hoardings from Old Central Bus Stand area.esakal

NMC on Unauthorized Hoarding : एसटी महामंडळाच्या जागेतील अनधिकृत होर्डिंग कोसळून दुर्घटना घडल्यास एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून गुन्हा दाखल करा असे पत्र सरकारवाडा, मुंबई नाका व पंचवटी पोलिसांना पाठविण्यात आल्यानंतर परिवहन महामंडळाकडून होर्डिंग उतरविण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली. महापालिकेच्या जाहिरात व परवाने विभागाने होर्डिंगवरून एसटी महामंडळाला धारेवर धरले आहे. (Actions taken by ST Corporation to remove unauthorised hoarding )

मुंबईतील घाटकोपर येथील छेडानगर मध्ये १२० बाय १२० आकाराचे भले मोठे होर्डिंग कोसळून १७ जण ठार झाले. या दुर्घटनेनंतर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवर आला. नाशिक महापालिकेला देखील शहरातील सर्व होर्डिंगचे फेर सर्वेक्षण करण्याच्या दिल्या. नाशिक महापालिका मार्फत मागीलवर्षी होर्डिंग्जच ऑडिट झाल्याने अनधिकृत असे होर्डिंग्ज आढळले नाही.

मात्र सर्वेक्षणात पंचवटी बस डेपो येथे पाच, जुने सीबीएस डेपो येथे चार व महामार्ग बस स्थानक परिसरात चार असे एकूण तेरा होर्डिंग्ज अनधिकृत व धोकादायक स्थितीत आढळले. त्यामुळे महापालिकेच्या जाहिरात व परवाना विभागाने एसटी महामंडळाला नोटीस बजावली होती. अनधिकृत व धोकादायक होर्डिंग तातडीने हटवावे अशा सूचना दिल्या. (latest marathi news)

Workers removing hoardings from Old Central Bus Stand area.
NMC on Unauthorized Hoardings: 68 होर्डिंग्जधारकांना अंतिम नोटिसा; स्टॅबिलिटी सर्टिफिकेट न दिल्यास कारवाई

मात्र एस. टी. महामंडळाकडून होर्डिंग्ज हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागून घेण्यात आली. मात्र आठ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरी अनधिकृत होर्डिंग काढले गेले नाही. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेतली. त्यात दुर्घटना घडेल अशा बाबी टाळण्याच्या स्पष्ट सूचना आहेत.

त्या अनुषंगाने महापालिकेत पंचवटी पोलिस ठाणे, सरकारवाडा तसेच मुंबई नाका पोलिस ठाण्याला पत्र पाठवून अनधिकृत होर्डिंग कोसळल्यास महापालिकेची जबाबदार राहणार नाही. एसटीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे पत्र दिल्यानंतर एसटी कडून जुने सीबीएस येथील धोकादायक होर्डिंग उतरविण्याची कार्यवाही सुरु झाली.

Workers removing hoardings from Old Central Bus Stand area.
NMC Hoarding Audit : शहरात धोकादायक होर्डिंगची शोधमोहीम; 3 संस्थांवर जबाबदारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com