Jal Jeevan Mission : जलजीवन योजनांची कामे संकटात; ठेकेदार काम न करण्याच्या तयारीत

Jal Jeevan Mission : पाणीपुरवठा योजनांची कामे मार्चअखेर पूर्ण करण्याची लगबग सुरू असतानाच झालेल्या कामांची देयके वेळेत मिळत नसल्याने ठेकेदार आक्रमक झाले आहेत.
Jal Jeevan Mission Scheme
Jal Jeevan Mission Schemeesakal

Jal Jeevan Mission : जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे मार्चअखेर पूर्ण करण्याची लगबग सुरू असतानाच झालेल्या कामांची देयके वेळेत मिळत नसल्याने ठेकेदार आक्रमक झाले आहेत. झालेल्या कामांच्या तुलनेत देयके मिळत नसल्याने पुढील कामे कशी करायची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ‘जलजीवन’च्या योजना संकटात सापडण्याची शक्यता आहे. (nashik Activities of Jal Jeevan Yojana in crisis marathi news)

जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदत असून, या मुदतीत अधिकाधिक योजना पूर्ण करून नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने ठेवले आहे. दुसरीकडे ठेकेदारांनी केलेल्या कामाच्या प्रमाणात देयके मिळत नाहीत. आतापर्यंत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून एक हजार ४१० कोटी रुपयांपैकी ५७१ कोटींची म्हणजे केवळ ४१ टक्के देयके दिली असून, त्या तुलनेत ठेकेदारांनी ५३ टक्के कामे केली आहेत.

यामुळे कामांच्या तुलनेत ठेकेदारांना तब्बल १२ टक्के कमी देयके मिळाली असल्याचे ‘सकाळ’ने गेल्या आठवड्यात निदर्शनास आणले होते. त्यामुळे ठेकेदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ३१ मार्चअखेर कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून दबाव टाकला जात आहे. मात्र, कामांची देयके देताना नवनव्या अटी टाकून देयके अडविली जात आहेत. त्यामुळे कामांच्या तुलनेत देयके अदा होत नाही.  (latest marathi news)

Jal Jeevan Mission Scheme
Jal Jeevan Mission : विलंब लावणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई; ‘सीईओ’ शुभम गुप्ता यांचा इशारा

यात नको त्या अटी लादल्या जात असून, वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. याचा फटका कामांना बसत आहे. मार्चअखेर असूनही देयके मिळत नसल्याने पुढील कामे कशी करायची, असा प्रश्न आहे. यावर काही संतप्त ठेकेदारांनी थेट झालेल्या कामांची देयके द्यावी, त्यानंतर आम्ही कामे बंद करतो, प्रशासनाने पुन्हा नव्याने निविदा काढून अन्य ठेकेदारांनी कामे द्यावी, अशी भूमिका मांडली आहे.

देयके मिळत नसल्याने ठेकेदारांनी एकत्र येत प्रशासनाशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी ठेकेदार संघटनेचे बाळासाहेब जाधव, सोपान खाडे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब वाघ, एस. नागरे आदी उपस्थित होते.

Jal Jeevan Mission Scheme
Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या कामांना 6 महिन्यांची मुदतवाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com