Nashik Aditi Tatkare : महिला व बालविकास भवनाच्या माध्यमातून बचत गटांना गती : आदिती तटकरे

Aditi Tatkare : महिला व बालविकास भवन नूतन इमारतीच्या माध्यमातून महिला बचत गटांना अधिक गती मिळणार आहे.
Guardian Minister Dada Bhuse during the groundbreaking ceremony of the new building of the Women and Child Development Center in the premises of the Social Welfare Complex, which is being implemented through the District Planning Committee. Neighbor MLA Prof. Devyani Farande, Ajay Boraste, Anil Dhikle along with officers and staff of the department etc.
Guardian Minister Dada Bhuse during the groundbreaking ceremony of the new building of the Women and Child Development Center in the premises of the Social Welfare Complex, which is being implemented through the District Planning Committee. Neighbor MLA Prof. Devyani Farande, Ajay Boraste, Anil Dhikle along with officers and staff of the department etc.esakal

Nashik Aditi Tatkare : महिला व बालविकास भवन नूतन इमारतीच्या माध्यमातून महिला बचत गटांना अधिक गती मिळणार आहे. शासनाच्या ले‍क लाडकी योजना, अंगणवाडी सेविकांसाठी मोफत शिबिरे, सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच सरकारच्या महिलांसाठी असलेल्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे भवन उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केले. (Nashik Aditi Tatkare statement of Speeding up self help groups through Mahila and Balvikas Bhavan marathi news)

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या समाजकल्याण संकुल आवारातील महिला व बालविकास भवनच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २३) करण्यात आले. या वेळी महिला व बालविकासमंत्री तटकरे दूरदृश्‍यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

कार्यक्रमास आमदार प्रा. देवयानी फरांदे, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, उपायुक्त देवीदास नांदगावकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गायकवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणी, विलास कवळे, सचिन शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता खेडकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Guardian Minister Dada Bhuse during the groundbreaking ceremony of the new building of the Women and Child Development Center in the premises of the Social Welfare Complex, which is being implemented through the District Planning Committee. Neighbor MLA Prof. Devyani Farande, Ajay Boraste, Anil Dhikle along with officers and staff of the department etc.
Aditi Tatkare: मंत्री अदिती तटकरेंकडून नगरोली-पोटणेर येथे विकास कामाचे भूमिपूजन

मंत्री तटकरे म्हणाल्या, की महिला व बाल सशक्तीकरण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तीन टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. नाशिक जिल्हा प्रशासकीय इमारती उभारणीत नेहमीच अग्रेसर आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्याचा संकल्प करून त्यादृष्टीने गरोदर माता व बालके यांचे अधिकाधिक पोषण, सुविधा उपलब्ध करून नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

पालकमंत्री भुसे यांनी या वेळी शुभेच्छा देत, जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी काम करावे, असे सांगितले. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, अनिल ढिकले, दिगंबर मोगरे आदी उपस्थित होते. (latest marathi news)

Guardian Minister Dada Bhuse during the groundbreaking ceremony of the new building of the Women and Child Development Center in the premises of the Social Welfare Complex, which is being implemented through the District Planning Committee. Neighbor MLA Prof. Devyani Farande, Ajay Boraste, Anil Dhikle along with officers and staff of the department etc.
Aditi Tatkare: मंत्री अदिती तटकरेंकडून नगरोली-पोटणेर येथे विकास कामाचे भूमिपूजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com