.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नाशिकला आदिवासी विद्यापीठ उभारणीची घोषणा अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जात आहे. राष्ट्रीय पातळीवर तिसरे महत्त्वाचे विद्यापीठ नाशिकला होत आहे. इतर खासगी शैक्षणिक संस्थांकडून अधिमत, स्वायत्त, स्वयंअर्थसहाय्य विद्यापीठ उभारणीच्या हालचाली यापूर्वीच सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकवर ‘एज्युकेशन हब’ ची मोहर लागणार असून, राज्य व देशभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी नाशिकला दाखल होतील. (Adivasi Universities strength as third university to emerging Education Hub )