Nashik Lok Sabha Constituency : नाशिकमध्ये तिरंगी, तर दिंडोरीत दुरंगी लढत!लोकसभा निवडणुकीचे माघारीनंतर चित्र स्पष्ट

Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या डॉ. भारती पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे भास्कर भगरे या दोघांमध्येच प्रमुख अशी दुरंगी लढत होणार आहे.
Parag Waje, Hemant Godse, Shantigiri Maharaj, 
Bhaskar Bhagare, Bharti Pawar
Parag Waje, Hemant Godse, Shantigiri Maharaj, Bhaskar Bhagare, Bharti Pawaresakal

Nashik News : लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत दिसत असली तरी प्रत्यक्षात शिवसेनेच्या ‘उबाठा’ गटाचे राजाभाऊ ऊर्फ पराग वाजे, तर शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्यातच प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. (Nashik Lok Sabha Constituency)

शांतिगिरी महाराज हे किती व कोणाची मते खेचतात, यावर विजयाचे गणित अवलंबून राहील. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या डॉ. भारती पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे भास्कर भगरे या दोघांमध्येच प्रमुख अशी दुरंगी लढत होणार आहे. २० मेस नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

त्यापूर्वी दाखल झालेले उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची सोमवारी (ता. ६) अंतिम मुदत होती. या मुदतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ‘उबाठा’ गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रविवारी रात्री त्यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेले निवृत्ती अरिंगळे यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांनी दुपारनंतर उमेदवारी अर्ज माघारी घेतला. अपक्ष अर्ज दाखल केलेले अनिल जाधव व अन्य इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. शांतिगिरी महाराज यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी महायुतीकडून त्यांची मनधरणी करण्यात आली. (Latest Marathi News)

Parag Waje, Hemant Godse, Shantigiri Maharaj, 
Bhaskar Bhagare, Bharti Pawar
Nashik Loksabha: शिंदे यांच्या आग्रहामुळे भुजबळांनी केली तलवार म्यान

मात्र शांतिगिरी महाराज यांनी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने चौरंगी लढत होणार आहे. परंतु असे असले तरी प्रामुख्याने लढत ही वाजे व गोडसे यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले. वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर, तर शांतिगिरी महाराज यांचा अपक्ष अर्ज आहे. शांतिगिरी महाराज किती मतदान घेतात, यावर विजयी उमेदवारांचे विजयाचे गणित अवलंबून आहे.

दिंडोरीत दुरंगी लढत

दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना आव्हान ठरणारे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यस्थी या वेळी कामी आली.

त्याबरोबर माकपचे जिवा पांडू गावित ऊर्फ जे. पी. गावित यांनी रविवारी (ता. ५) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची घोषणा केली होती. त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे पारडे जड झाल्याचे दिसत असले, तरी दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारांची मत विभागणी टळली आहे.

दिंडोरी भाजपच्या डॉ. पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भगरे या दोघांमध्येच प्रमुख लढत राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मालती थविल यांचा उमेदवारी अर्ज कायम असल्याने तिरंगी लढत दिसत असली तरी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष या दोन्ही पक्षांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Parag Waje, Hemant Godse, Shantigiri Maharaj, 
Bhaskar Bhagare, Bharti Pawar
Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com