Nashik Agriculture News: शेतशिवार फुलल्याने शेतमजुरांना दिलासा; डाळिंबासह इतर फळपिकेही बहरली

Pomegranate
Pomegranateesakal

मालेगाव : तालुक्यासह कसमादे भागात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतशिवार फुलले आहेत. पूरपाण्याने विविध पाणीपुरवठा योजनांसह लाभक्षेत्रातील शेतीला फायदा होत आहे. पोळ व रांगडा कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू आहे.

भाजीपाला लागवडीबरोबरच डाळिंब बागेतील कामांनाही गती आली आहे. शेतमजुरांना काम मिळू लागल्याने शेतीचे अर्थचक्र फिरू लागले आहे. आगाऊ पेरणी केलेले बाजरी व मका काढणीचे काम काही ठिकाणी सुरू आहे. (Nashik Agriculture News Relief to farm laborers as Shetshivar blooms Other fruit crops including pomegranate also flourished)

कसमादेतील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतमजुरांना पुरेसे काम नव्हते. अनेकांनी शहरी भागात येऊन मिळेल ते काम स्वीकारले. गणेशोत्सवात चित्र एकदम पालटले. आठवडाभर सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली.

भीजपावसामुळे विहिरींना पाणी उतरण्यास मदत झाली. या वर्षी पावसाअभावी खरीप वाया गेला. अर्धवट आलेले मका व बाजरीचे पीक चारा म्हणून काढण्यात आले. शेतकऱ्यांनी पोळ व रांगडा कांद्याची लागवड सुरू केली आहे.

पंधरा दिवसांपासून कांदा लागवड सुरू असल्याने शेतमजुरांना काम मिळत आहेत. महिलांना दोनशे ते अडीचशे रुपये, तर पुरुषांना तीनशे ते चारशे रुपये रोज मिळत आहे.

चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनंद ही प्रमुख धरणे ओव्हरफ्लो झाल्याने गिरणा व मोसम नदीला पूरपाणी आले आहे. त्याचा फायदा बंधारे व विविध पाणीपुरवठा योजनांचे जलसाठे भरण्यास झाला आहे.

Pomegranate
Success: वांगे, पपईने दिली लाखमोलाची साथ! जिद्द, चिकाटीच्या जोरावर ब्राह्मणगावच्या युवा शेतकऱ्याच्या प्रयत्नांना फळ

मोसम नदीवरील कालव्यातून पाणी वाहत असल्याने लाभक्षेत्रातील शेतीला त्याचा फायदा होत आहे. गिरणा नदीतून महिन्यापासून पूरपाणी वाहत आहे. गिरणा उजवा व डावा कालवा दुथडी वाहत असल्याने लाभक्षेत्रातील तलाव, पाझर तलाव, पाणीपुरवठा योजनांचे साठे भरत आहेत.

शेतीलाही पूरपाण्याचा फायदा होत आहे. गेल्या आठवड्यातील रिमझिम पाऊस व पूरपाण्यामुळे दुष्काळी परिस्थिती निवळण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचीही मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे.

डाळिंबासह इतर फळपिकांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे. एकूणच शेतमजुरांना मुबलक काम मिळत आहे. शेतशिवार फुलल्याने चारा व पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात का होईना सुटण्यास मदत झाली आहे.

Pomegranate
Pitru Paksha: पितृपक्षात आवक वाढल्याने भाज्या स्वस्त! स्वच्छ वातावरणामुळे ताजा भाजीपाला उपलब्ध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com