Nashik Agriculture News : फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान! पडीक, वरक, शेताच्या बांधावर लागवडीचे आवाहन

Nashik News : पडीक जमिनीसह वरक व शेताच्या बांधावर फळबागेची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनुदान मिळणार आहे.
Coconut seedlings available for sale.
Coconut seedlings available for sale.esakal
Updated on

Nashik News : पडीक जमिनीसह वरक व शेताच्या बांधावर फळबागेची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनुदान मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी केले आहे. फळबाग लागवड योजनेत शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा. (Agriculture Subsidy to farmers for orchard cultivation)

योजनेत सहभागी होण्यासाठी शेतीचा नवीन सातबारा उतारा व आठ (अ) उतारा, ग्रामपंचायत कार्यालयातून मिळालेले जॉब कार्ड, तसेच आधारकार्ड, बँक पासबुक यांची साक्षांकित प्रत, शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक, फळबाग लागवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयातून मिळणारा अर्ज भरून द्यावा लागणार आहे.

फळझाडांच्या कलमांसाठी अनुदान उपलब्ध असून, आंबा, पेरू, डाळिंब, सीताफळ, बांबू, ड्रॅगन फ्रूट, केळी, द्राक्ष, वनौषधी आदी फुलपिके, फळपिकांचा समावेश आहे. (latest marathi news)

Coconut seedlings available for sale.
Career In Agriculture: कृषी आधारित उद्योग व्यवसायातील व्यवस्थापन तज्ज्ञ होण्यासाठी करा या अभ्यासक्रमांची निवड

विविध कलमांनुसार हेक्टरी संख्या व तीन वर्षांपर्यंत असणाऱ्या अनुदानाची माहिती कृषी विभागाकडे मिळेल, असे सोनवणे यांनी सांगितले.

नारळाची साडेतीन हजार रोपे

कृषी विभागाकडे सद्यस्थितीला साडेतीन हजार नारळाची रोपे तयार झाली आहेत. उपयुक्त अशी ही रोपे शेतकऱ्यांना अनुदानावर मिळतील. त्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

Coconut seedlings available for sale.
Agriculture Seeds : बियाण्यासाठी उन्हाच्या काहिलीत शेतकऱ्यांच्या रांगा; वादंगामुळे गोंधळ, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.