
AI-Chatbot : तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधला जाणार असल्याने देशातील पहिला ‘एआय कुंभ’ नाशिकमध्ये होणार आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराच्या उद्देशाने पहिल्या ‘बिल्डथॉन’चे नाशिकमध्ये औपचारिक उद्घाटन झाले. या वेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित ‘एआय-चॅटबोट’चे विमोचन केले. या माध्यमातून कुंभमेळ्याची माहिती प्रसारित करणे सुलभ होणार आहे. (AI Chatbot will provide information about Kumbh Mela )