Nashik Air Service : नाशिकहून Indigo अन् Spicejetची नववर्षात विमानसेवा! विकासाला गती येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ozar airport

Nashik Air Service : नाशिकहून Indigo अन् Spicejetची नववर्षात विमानसेवा! विकासाला गती येणार

नाशिक : स्पाइस जेट आणि इंडिगो कंपनीने नवीन वर्षात नाशिकहून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यात गोवा, अहमदाबाद, नागपूर, बेंगळुरूचा समावेश आहे. इंडिगोच्या विमानसेवेची नाशिककरांना तीन वर्षांपासून प्रतीक्षा होती.

सध्यस्थितीत नाशिक-हैदराबाद आणि नाशिक-नवी दिल्ली अशी स्पाइस जेटची विमानसेवा सुरू आहे. (Nashik Air Service Indigo and Spicejet flight service from Nashik in new year Development nashik news)

इंडिगोने नाशिकहून गोवा, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद अशी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पाइस जेटने आणखी तीन शहरांसाठी विमान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये बेंगळुरू, अहमदाबाद, गोवाचा समावेश आहे. विमानसेवा सुरु करण्यासंबंधीचे पत्र केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि ओझरच्या एच. ए. एल. विमानतळ प्रशासनाला पाठवले आहे.

एच.ए.एल.तर्फे गेल्या काही दिवसांपासून विमानसेवा वाढवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. त्यास अखेर यश आल्याने नाशिकच्या विकासाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर धार्मिक, अध्यात्मिकतेच्या सोबत निसर्गराजीमधील पर्यटनाचा वेग वाढणार आहे.

विशेष म्हणजे, ‘नाशिक फिल्म इंडस्ट्री’ व्हावी म्हणून सुरु असलेल्या प्रयत्नांना गती अपेक्षित आहे. त्याचबरोबर औद्योगिक नगरीचे महत्त्व वृद्धींगत होत असताना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकीय नेत्यांच्या नाशिकमधील ये-जा वाढीस लागेल. कृषी पंढरी, ‘वाइन कॅपिटल अशी ओळख निर्माण करणाऱ्या नाशिकमधील क्रीडा क्षेत्राला यानिमित्ताने चालना मिळणार आहे.

हेही वाचा: Nashik News: दोनदा भूमिपूजन होऊनही रस्त्याचे काम सुरू होईना! टाकेद- धामणगाव रस्त्याची स्थिती

एअर इंडियाची उपकंपनी अलायन्स एअरतर्फे नाशिक-अहमदाबाद, पुणे, बेळगाव विमानसेवा सुरू होती. उडान योजनेची मुदत संपल्याचे कारण देत सेवा बंद झाली होती. त्यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय हवाई नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहिले होते.

शिवाय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह औद्योगिक क्षेत्रातर्फे विमानसेवा वाढावी म्हणून प्रयत्न करण्यात येत होते. विमान कंपन्यांनी नाशिकसाठी २६ मार्च ते २८ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत विमानसेवा देण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. या विमानसेवांसाठी तिकीट बुकिंग सुरु झाले आहे.

हेही वाचा: Election News : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीसह 5 जागांसाठी 30 जानेवारीला मतदान

इंडिगो कंपनीचे वेळापत्रक

शहराचे नाव उड्डाण वेळ पोचण्याची वेळ

हैदराबाद सकाळी ६.५५ नाशिक सकाळी ८.५५
नाशिक सकाळी ९.१५ गोवा सकाळी ११.२०
गोवा सकाळी ११.४० नाशिक दुपारी १.३५
नाशिक दुपारी १.५५ अहमदाबाद दुपारी ३.२०
अहमदाबाद दुपारी ३.४० नाशिक सायंकाळी ५.०५
नाशिक सायंकाळी ५.२५ नागपूर सायंकाळी ७.१५
नागपूर रात्री ७.३५ नाशिक रात्री ८.२५
नाशिक रात्री ८.४५ हैदराबाद रात्री ११.४०

स्पाइस जेट कंपनीचे वेळापत्रक

शहराचे नाव उड्डाण वेळ पोचण्याची वेळ

नवी दिल्ली दुपारी १२.३५ नाशिक दुपारी २.४०
नाशिक दुपारी २.५० नवी दिल्ली दुपारी ४.४०
हैदराबाद सकाळी ६.२० नाशिक सकाळी ७.५५
नाशिक सकाळी ८.२० हैदराबाद सकाळी ९.५५
बेंगळुरू सकाळी ७.५५ नाशिक सकाळी १०.०५
नाशिक सकाळी १०.२५ अहमदाबाद दुपारी १२
अहमदाबाद दुपारी १२.३० गोवा दुपारी २.०५
गोवा सायंकाळी ४.३० नाशिक सायंकाळी ५.४०
नाशिक सायंकाळी ६ बेंगळुरू रात्री ८.१०

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Nashik Crime News : शर्ट चोरल्याच्या कारणावरून सेल्समनला बेदम मारहाण! मालकासह बाऊंसरवर गुन्हा दाखल

"नाशिकच्या ओझर विमानतळावर ‘नाईट लँडींग'ची परवानगी मिळाली आहे. सायंकाळी सहानंतर शिर्डी विमानतळावर विमान पोचल्यास ते ‘नाईट लँडींग’ साठी ओझरमध्ये पाठवले जाते. त्यामुळे आगामी काळात ‘नाईट लँडींग’ ची समस्या भेडसावणाऱ्या मुंबईसह देशातील इतर विमानतळावरील विमाने ओझरला पाठवण्याची आवश्‍यकता आहे. ओझर विमानतळावर सहा हँगर असल्याने एटीआर (छोटी ७२ आसनांची विमाने) ‘पार्किंग’ ची व्यवस्था आहे. एच. ए. एल. तर्फे संरक्षण विभागाच्या विमानांचे एमआरओ (मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉलिंग) करण्याची सोय उपलब्ध आहे. आता व्यावसायिकदृष्ट्या खासगी हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानांचे एमआरओचे काम सुरु झाले. त्यामुळे प्रवासी वाहतुकीची विमाने एमआरओ साठी ओझरमधील एच. ए. एल. मध्ये पाठवण्याची व्यवस्था होणे आवश्‍यक आहे. त्यातून खऱ्या अर्थाने नाशिकची विमानसेवा अव्यहातपणे सुरु राहण्यास मदत होईल."

- मनीष रावल, एव्हिएशन समिती, ‘आयमा'

हेही वाचा: Nashik News : पालकमंत्र्यांच्या घरासमोरील बिऱ्हाड आंदोलनात राजु शेट्टी सहभागी होणार!