Nashik Airport : ओझरला भविष्यात दुसरा स्वतंत्र रनवे

nashik air service
nashik air serviceesakal

नाशिक : ओझर विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलेले विमानतळ नव्याने सुरू करताना एचएएल प्रशासनाने आधुनिक सुविधा प्रदान केल्या आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रनवेला समांतर नवीन रनवे तयार करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान एचएएलतर्फे विमान कंपन्यांना रात्रीची मोफत पार्किंगची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

nashik air service
Nashik News : हेडगेवारनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रंगतात रात्रीच्या ओल्या पार्ट्या!

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीतर्फे नाशिक (ओझर) विमानतळाचे संचालन केले जाते. २० नोव्हेंबरपासून विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम नुकतेच पूर्ण करण्यात आल्याने धावपट्टीची क्षमता वाढल्याचा दावा एचएएलतर्फे करण्यात आला आहे. धावपट्टीची दुरुस्ती झाल्यानंतर भारतीय वेळेनुसार सकाळी आठ ते रात्री दहा या कालावधीमध्ये वर्षभर धावपट्टी कार्यरत राहणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. ओझर विमानतळावर भविष्यात नागरी उड्डाणाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी व ऑपरेशनल क्षमता वाढविण्यासाठी नवीन समांतर दुसऱ्या धावपट्टीची योजना आखण्यात आली आहे. अतिरिक्त टॅक्सी वे लिंक विमान पार्किंगचा विचार केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे भविष्यात ओझर विमानतळाच्या विस्तारासह नागरी विमान वाहतूक उड्डानाला चालना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

nashik air service
Nashik International Airport : नाशिक आता आंतरराष्ट्रीय विमानतळ

इंधन भरण्याची सुविधा

एचएएल परिसरात इंडियन ऑइल कार्पोरेशन कंपनीने इंधन भरण्याची सुविधा यापूर्वीच स्थापित केली आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडतर्फेही नागरी उड्डाणाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी विमानतळ परिसरात इंधन भरण्याचे स्टेशन स्थापन केले आहे.

अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे

विमानतळ तसेच परिसरात सध्या अस्तित्वात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची क्षमता वाढविण्यात आली आहे. बीसीएएसच्या शिफारशींच्या अनुषंगाने विमानतळ सुरक्षा वाढविण्यासाठी टर्मिनल बिल्डिंग एटीसी रनवे व पार्किंग तसेच एरोड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे अत्याधुनिक तंत्रज्ञान डिजिटल सिस्टमसह बदलले जाणार आहे.

nashik air service
Nashik News : पतंगाच्या मोहापायी 13 वर्षीय मुलाने गमावला जीव; 3 दिवसानंतर नदीपात्रात आढळला मृतदेह

शुल्कात सवलत, रात्रीचे पार्किंग

ओझर विमानतळाचे संचलन करणाऱ्या एचएएलतर्फे विमान कंपन्यांना नाशिककडे आकर्षित करण्यासाठी एरोनॉटिकल तसेच नॉन एरोनॉटिकल शुल्कात भरीव सवलत व ऑपरेशनच्या सुरुवातीच्या काळात मोफत रात्रीची पार्किंगची सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. ओझर विमानतळाचा वापर रात्रीच्या पार्किंगसाठी व वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी देखील करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com