
दिंडोरी- लखमापूर : जिल्ह्यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवून मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी नार-पार योजनेकरिता आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी निधी देणार, जिल्ह्यासाठी टिटवी हे नवीन धरण करून ते पाणी फक्त पिण्यासाठी वापरण्यात येईल, तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न असलेल्या कांद्याची निर्यात सुरूच ठेवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नार-पार अन् टिटवी धरणासाठी केंद्राकडून अतिरिक्त निधी आपण मिळविणार असून, या सर्व योजना प्रत्यक्षात राबविणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Ajit Pawar Jan Sanman Yatra)