chhagan bhujbal and hemant godse
chhagan bhujbal and hemant godseesakal

Nashik Lok Sabha Constituency: जागा वाटप साताऱ्याचे, नाशिकमध्ये वाढल्या अपेक्षा; शिंदे सेनेचाही मुंबईत तळ

Lok Sabha Constituency : राज्यात महायुतीच्या जागा वाटपामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळविण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले.

Nashik Lok Sabha Constituency : राज्यात महायुतीच्या जागा वाटपामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळविण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले. परंतु दुसरीकडे साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे येईल अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाकडून व्यक्त होत आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे पदाधिकारीदेखील मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तळ ठोकून बसले असून त्यांनादेखील नाशिकची जागा हवी आहे. (nashik Ajit Pawar faction of NCP is expecting that seat of Nashik )

महायुतीच्या जागा वाटपामध्ये राज्यातील नऊ जागा संदर्भात तिढा आहे. यातील सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उदयसिंह राजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाला हवा होता. परंतु खासदार भोसले यांच्यासाठी हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसने सोडला आहे. त्यामुळे साताऱ्याच्या बदल्यात नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे यावा अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड झाल्याचे मानले जात आहे.

उत्तर महाराष्ट्रात अस्तित्वाची धडपड

महायुतीमध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक वगळता सर्व जागांचे वाटप जवळपास पूर्ण झाले आहे. नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला हवी आहे. उत्तर महाराष्ट्रात एक नाशिकची जागा असल्याने शिंदे गटाकडून देखील प्रतिष्ठेचा मुद्दा बनविण्यात आला आहे. यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तळ ठोकून आहेत. शिंदे सेनेला नाशिकची जागा सुटली तरी उमेदवार कोण याबाबत मात्र अद्याप निश्चिती नाही.(latest marathi news)

chhagan bhujbal and hemant godse
Nashik Lok Sabha Constituency : आघाडीच्या प्रचाराचा धुराळा, महायुतीत घडामोडी; महायुतीची उमेदवारीवर खलबते

महायुतीचा प्रचार करू

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र भाजपकडून भुजबळ यांना महायुतीकडून विदर्भात प्रचारात उतरविण्यात आले आहे. विदर्भात प्रचाराला जाण्यापूर्वी भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नाशिकच्या जागे संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र जो काही निर्णय होईल त्यानुसार महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करू. नाशिकच्या जागे संदर्भात काही चर्चा झाली नाही.

जागा वाटपासंदर्भात काही बोलायचे असेल तर मी प्रफुल्ल पटेल यांच्याशी बोलेन. ते योग्य निर्णय घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा घटक असल्याने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जात असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. प्रचारात विकास हा आमचा प्रचाराचा मुख्य मुद्दा असल्याचे भुजबळ म्हणाले. निवडणुकीसाठी चिन्ह आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह आम्हाला मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयातही आम्ही जिंकू असा दावा त्यांनी केला.

chhagan bhujbal and hemant godse
Jalgaon Lok Sabha Constituency : प्रतिस्पर्धी उमेदवार बदलण्याची यंदा झाली ‘हॅटट्रिक’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com