
लासलगाव, विंचूर : लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील कांद्याने वांदा केला होता. त्यामुळे कांदा निर्यातबंदी करायची नाही, असे आम्ही केंद्राला सांगितले. तुमच्यासारखीच माझीही शेतकरी जात आहे. तुम्हाला योग्य दिशेने जायचे आहे म्हणून ही जनसन्मान यात्रा आहे. शेतकरी बांधवांना मोफत वीज, दुधाला पाच रुपये अनुदान आम्ही जाहीर केले आहे. या योजनांचा फायदा जनतेला होण्यासाठी आपला प्रयत्न आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. ९) लासलगाव येथे सांगितले. (Ajit Pawar Jan Sanman Yatra statement on onion problem)