
लासलगाव, विंचूर, निफाड : राज्याच्या साडेसहा लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्पातून लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी रुपये बाजूला ठेवणं हे सहज शक्य असून महायुती सरकारतर्फे राज्यातील जनतेच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या विकासाच्या योजना या अविरत सुरू राहतील कारण जनतेचा विकास हा महायुती सरकारचा अजेंडा असेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. (Ajit Pawar Development of people agenda of mahayuti government)