कारमधून विदेशी मद्याची तस्करी

कारमधून विदेशी मद्याची तस्करी
Published on: 
फोटो : H32519 नाशिक : आंबोली फाट्यावर कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले विदेशी मद्यसाठा व वाहनासह संशयित. समवेत राज्य उत्पादन शुल्काचे नाशिक विभागाचे पथक. कारमधून विदेशी मद्याची तस्करी त्र्यंबकेश्वर रोडवर कारवाई; पाच लाखांचा मद्यसाठा जप्त सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : परराज्यातून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘ड’ विभागाने गुरूवारी (ता. १५) त्र्यंबकेश्वर- जव्हार रस्त्यावरील आंबोली फाट्याजवळ सापळा रचून गोवा-दमण बनावटीच्या मद्यासह चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. ५ लाख ९ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून, मद्य पुरवठादार आणि खरेदीदारांचा शोध सुरू आहे. आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, नाशिक विभागाच्या विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक अ. सु. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे निरीक्षक एन. एच. गोसावी यांच्या पथकाने आंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) परिसरात सापळा रचला होता. संशयावरून चारचाकी कार (एमएच १२ एचव्ही ०८१८) थांबवून तपासणी केली असता, त्यात केंद्रशासित प्रदेश दमण, दीव व दादरा नगर हवेली येथेच विक्रीस परवानगी असलेला विविध विदेशी मद्याचे १६ बॉक्स मिळून आले. याप्रकरणी चालक रतन छबूराव जाधव (वय ३०, रा. सोमेश्वर मंदिराजवळ, सिडको, नाशिक) यास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई निरीक्षक एन. एच. गोसावी, दुय्यम निरीक्षक एस. आर. इंगळे, व्ही. एन. बावीस्कर, जी. बी. नागरगोजे, विष्णू सानप, वंदना देवरे आणि जवान एस. ए. माने, उर्वेश देशमुख, लक्ष्मीकांत अहिरे, स्वप्नील सूर्यवंशी, लोकेश गायकवाड व महेश खामकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक एन. एच. गोसावी करीत आहेत. -- कोट अवैध दारूनिर्मिती, विक्री व वाहतुकीबाबत नागरिकांना काही माहिती किंवा तक्रार असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९, व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ किंवा कार्यालयीन दूरध्वनी ०२५३-२५८१०३३ वर संपर्क साधावा. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे तात्काळ कारवाई करण्यात येईल. - संतोष झगडे, अधीक्षक, एक्साईज, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com