Nashik News : पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रासह अन्य राज्यांवर अन्याय!

Nashik News : पंतप्रधान मोदी गुजरातला मजबूत करत असून, अन्य राज्यांना कमजोर करत देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया प्रभारी प्रगती अहीर यांनी केला.
Media in charge Pragati Ahir speaking at a press conference organized on behalf of City Congress on Monday
Media in charge Pragati Ahir speaking at a press conference organized on behalf of City Congress on Mondayesakal

Nashik News : महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे चुकीच्या पद्धतीने गुजरातकडे वळविण्यात आल्यामुळे सहाजिकच महाराष्ट्रातला तरुण बेरोजगार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगार नोकरीसाठी गुजरातला जात आहे. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाला केंद्र सरकारचे धोरणे जबाबदार आहे. पंतप्रधान मोदींचे उद्देश सर्व राज्यांप्रति सारखा असावा. (Prime Minister Modi is doing injustice to Maharashtra and other states)

परंतु पंतप्रधान मोदी गुजरातला मजबूत करत असून, अन्य राज्यांना कमजोर करत देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया प्रभारी प्रगती अहीर यांनी केला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया प्रभारी प्रगती अहीर सोमवारी (ता. ६) नाशिक दौऱ्यावर होत्या.

त्यांनी पक्षाच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला जाहीरनाम्याविषयी माहिती दिली. खासदार राहुल गांधी यांनी भारत न्याय जोडो यात्रेदरम्यान कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या नागरिकांशी संवाद साधत, त्यांचे प्रश्न समजावून घेत पक्षाचा जाहीरनामा तयार केला आहे. महिला, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवा या सर्व घटकाला न्याय देणारा हा जाहीरनामा आहे.

याउलट भारतीय जनता पक्षाने गुजरात मॉडेल्स दाखवून जुमलेबाजी करण्याचा प्रयत्न केला आहे. तो फसवेगिरी करणारा आहे. सामान्य नागरिक या जुमलेबाज भाजपला येत्या लोकसभेतन चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. (Latest Marathi News)

Media in charge Pragati Ahir speaking at a press conference organized on behalf of City Congress on Monday
Nashik Lok Sabha Constituency : गोडसे, वाजेंसह 2 महाराज नाशिकच्या आखाड्यात; करंजकर, अरिंगळेंसह 5 इच्छुकांची माघार

दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधारी जुमलेबाजांकडून सुरू असून, त्याचा पर्दाफाश करण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. कांदा निर्यातबंदी उठवली ती केवळ गुजरातच्या व्यापारांना फायदा व्हावा म्हणून मोदी सरकारने ही सवलत दिली. महाराष्ट्रप्रमाणे गुजरातच्या शेतकऱ्याला ही निर्यात शुल्क परवडण्यासारखी नसल्याचे अहीर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातून महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड, प्रवक्ते राजेंद्र बागूल, सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, हानिफ बशीर, गौरव सोनार आदी उपस्थित होते.

Media in charge Pragati Ahir speaking at a press conference organized on behalf of City Congress on Monday
Nashik Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरीत ‘तोफा’ धडाडणार; पंतप्रधानांची सभा 17 ला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com