.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik Bhavali Dam : निसर्गाचे वरदान लाभलेल्या इगतपुरी तालुक्यासह परिसरात सध्या जोमाने श्रावणसरी व मुसळधारेसह संततधार पाऊस बरसत आहे. यामुळे सगळीकडे गर्द हिरवाई दाटल्याने सोबतच सर्वत्र पाणीच पाणी वाहत असल्यामुळे धबधबे खळाळून वाहत आहेत. श्रावणसरींची मनसोक्त मौज घेणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिकांच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पर्यटक भंडारदरा धरण तसेच रंधा फॉलकडे जात असल्याने मार्गावरील दुकानदारांचा व्यवसाय वाढला आहे. (Along with tourism economy also gained momentum at igatpuri bhavali dam )