
नाशिक : शहरातील मोकाट व भटक्या जनावरांना अपघात झाल्यास किंवा आजारी पडल्यास रुग्णालयापर्यंत त्यांची वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली असून मागील दोन महिन्यात १६० प्राणी रुग्णांना पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या व मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. रस्त्यावरील अपघातांमुळे प्राणी कायमचे जायबंदी होतात.