Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरी, नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपकडून बूथनिहाय मतदानाचे विश्‍लेषण

Lok Sabha Constituency : दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवारांसाठी सोपे असतानाही शेवटच्या टप्प्यात अवघड झाल्याने भाजप नेत्यांना मतदान पदरात पाडून घेण्यासाठी मोठी शिकस्त करावी लागली.
Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency esakal

Nashik News : दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवारांसाठी सोपे असतानाही शेवटच्या टप्प्यात अवघड झाल्याने भाजप नेत्यांना मतदान पदरात पाडून घेण्यासाठी मोठी शिकस्त करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रत्येक बूथवर किती मतदान झाले. (Nashik Lok Sabha Constituency)

या संदर्भातील आकडेवारीचे विश्लेषण करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या २० मेस मतदान झाले. नाशिक व दिंडोरी हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ महायुतीसाठी सोपे होते. दिंडोरीमधून भाजपचा उमेदवार सहजपणे निवडून येईल व नाशिकमध्येही शिंदे गटाला फारशी शिकस्त करावी लागणार नाही, असे वातावरण होते.

मात्र दिंडोरीमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच नकारात्मक वातावरण तयार झाले. त्यात कांदा हा विषय महत्त्वाचा असला तरी त्याला प्रत्युत्तर देण्यात भाजप व महायुतीचे पदाधिकारी अपयशी ठरले. त्यामुळे मतदानाच्या शेवटच्या चार दिवसांत भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी भाजपची निवडणूक यंत्रणा हातात घेतली. मतदानाच्या दिवशी व मतदानानंतर भाजपला चांगले वातावरण तयार झाल्याचा दावा यानिमित्ताने करण्यात आला.

अशीच काहीशी परिस्थिती नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये होती. नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे असली तरी महायुती म्हणून तसेच उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे असल्याने त्यांनी शेवटच्या दोन दिवसांत नाशिकमध्ये लक्ष घातले. त्यातून त्यांनी योग्य नियोजन केल्याने नाशिकमध्ये ‘धनुष्यबाण’ चालल्याचा दावा महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. (latest marathi news)

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Election : जिल्ह्यातील मतदानात महिला बचतगट आघाडीवर

अहवाल ठरणार तारणहार

दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची यंत्रणा कामाला लावली. त्याचबरोबर दिंडोरी मतदारसंघाचे स्टिअरिंग गिरीश महाजन यांनी हाती घेतले. त्यामुळे तळागाळापर्यंत यंत्रणा हलली. त्यामुळे आता बूथनिहाय किती मतदान झाले, याचे परीक्षण होणार असल्याने यावरून कोणी किती काम केले, असादेखील निष्कर्ष काढला जाणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातही अशीच परिस्थिती असल्याने महाजन यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा अहवाल मागितला आहे. यात कुठल्या बूथवर किती मतदान झाले, याची माहिती मिळणार असून, त्या दृष्टीने महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी देताना याचाही विचार होणार आहे.

उत्तर महाराष्‍ट्रातील अहवाल तपासणार

महाजन यांच्याकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, नंदुरबार व धुळे या सहा लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी होती. त्यामुळे विश्‍लेषण करतना या सहा मतदारसंघांत बूथनिहाय किती मतदान झाले. ज्या भागात कमी मतदान झाले तेथे भाजप, महायुतीची यंत्रणा कमी पडली का, याचादेखील अभ्यास केला जाणार आहे.

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Election: निवडणूक संपली; आता चर्चा आघाडी, विजयाची! कोण येणार निवडून, यापेक्षा आघाडी किती मिळणार याला उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com