
नाशिक : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात २१ व्या पशुगणनेस त्र्यंबकेश्वर येथील गोशाळेतून सुरवात झाली. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे, उपायुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संतोष शिंदे, पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेश मेहरे उपस्थित होते. या गणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. जिल्ह्यात शहरासाठी १६५ व ग्रामीण भागात ३८४ प्रगणक मोबाईल ॲपद्वारे सर्वेक्षण करणार आहेत.