Nashik Fraud Crime : दिले 5 लाख, उकळले 18 लाख! अवैध सावकारीचा आणखी एक गुन्हा दाखल

Fraud Crime : गेल्या काही महिन्यांपासून शहरात अवैध सावकारीविरोधात गुन्हे दाखल होत आहेत.
crime
crimeesakal

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून शहरात अवैध सावकारीविरोधात गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे शहरात किती मोठ्याप्रमाणात अवैध सावकारी बोकाळली आहे, हेच अधोरेखित होते आहे. म्हसरूळ पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यात संशयित दाम्पत्याने ५ लाख रुपये व्याजाने देताना महिलेकडून तब्बल १८ लाखांची वसुली केली असून, आणखी ७ लाखांची मागणी करीत मारहाणीचीही धमकी दिली आहे. (Another case of illegal money lender registered in city )

मंगला अहिरे उर्फ मंगला गायकवाड, दीपक गायकवाड (दोघे रा. साईशिल्प अपार्टमेंट, शिवगंगा नगर, म्हसरुळ), भोजूसिंग गिरासे अशी संशयितांची नावे आहेत. उन्नती योगेश जैन (रा. साई संस्कृती अपार्टमेंट, शिवगंगा नगर, म्हसरुळ) यांच्या फिर्यादीनुसार, त्या घरगुती शिवणकाम करीत त्यांच्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालवितात.

दरम्यान, मार्च २०२२ मध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्य आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी उन्नती व त्यांचा पती योगेश यांना आर्थिक चणचण भासली. त्यामुळे त्यांनी त्या राहत असलेल्या इमारतीतीलच अवैधरित्या सावकारी करणार्या संशयित मंगला व दीपक गायकवाड यांच्याकडून ५ लाख ९ हजार २०९ रुपये व्याजाने घेतले.

या रकमेवर दरमहा १० ते २० टक्के व्याज आणि त्यावरील दंड अशारितीने संशयित गायकवाड दाम्पत्याने मार्च २०२४ पर्यंत कर्जाच्या ५ लाख रुपयांच्या मोबदल्यामध्ये व्याज, मुद्दल, दंड मिळून तब्बल २३ लाख ५४ हजार ८०५ रुपये वसूल केले आहेत. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात संशयितांविरोधात अवैध सावकारीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे हे तपास करीत आहेत.

crime
Nashik Crime News : चिमुरड्याचा खून करून फेकले झुडपात

घराच्या कागदपत्रांची मागणी

संशयितांनी पीडितेच्या पतीकडून १८ लाख ४५ हजार ५९६ रुपये अतिरिक्त वसुल केल्यानंतरही संशयितांनी त्यांच्याकडे आणखी ७ लाख रुपयांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास राहत्या घराच्या कागदपत्रांची मागणी केली. पैसे व घराचे कागदपत्र देत नसल्याने संशयितांनी त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करीत त्यांना मारण्याची धमकीही दिली.

अवैध सावकारीला आळा बसेल का?

शहरात अवैध सावकारी मोठ्याप्रमाणात बोकाळली आहे. अनेकांकडे परवाने नसतांनाही अवैधरित्या सावकारी करीत कर्जदारांना धमकावून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने कोट्यवधी रुपये उकळले आहेत. सावकारीचा धंद्यामुळे दुचाकीवर फिरणारे काही दिवसातच गळ्यात सोन्याच्या चैन, हातात ब्रेसलेट आणि अलिशान कारमधून फिरतात.

गेल्या महिन्यांत अवैध सावकार वैभव देवरे याच्याविरोधात पाच गुन्हे दाखल झाले असून सध्या पोलीस कोठडीत आहे. म्हसरुळ पोलीस ठाण्यातही गेल्या महिन्यात अवैध सावकारांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पाठोपाठ गुन्हे दाखल होऊनही अवैध सावकारीला आळा बसू शकलेला नाही. त्यामुळे अशा अवैध प्रकारांना आळा बसू शकेल का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

crime
Nashik Crime News : महिलेच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com