
नाशिक : साखर एक्स्पोर्टचा व्यवसाय करणाऱ्या महिलेस साखर एक्स्पोर्ट करण्याच्या नावाखाली तब्बल दोन कोटी ५३ लाखांना गंडा घालणाऱ्या संशयितास गुंडाविरोधी पथकाने मीरा भाईंदर हद्दीतून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. जानेवारी २०२३ मध्ये संशयिताने फसवणूक केली होती. अमित अनंत महाडिक (वय ४३, रा. गुलमोहर कॉम्प्लेक्स, फेझ १, वसई विरार) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. अमित यास बोळींज पोलिस ठाणे, मीरा भाईंदर हद्दीतून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले आहे.