नाशिक: उपनगर परिसरातील एकाच अपार्टमेंटमधील बंद असलेले दोन फ्लॅटचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी सव्वा लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. तर, सातपूरच्या निगळ मळ्यात आणि कामटवाडे शिवारात दोन घरफोड्यांत चोरट्यांनी ऐवज लांबविला आहे. शहरात दिवसरात्र गस्त वाढविण्यात आलेली असतानाही चोऱ्या, घरफोड्या सुरू असल्याने पोलिसांची गस्त कूचकामी ठरत असल्याचे शहर, परिसरात होत असलेल्या घटनांमधून अधोरेखित होत आहे.