
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, मंगळवारी (ता. २२) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात १५ विधानसभा मतदारसंघांमधील तहसील किंवा प्रांताधिकारी कार्यालयांत सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. (Application process for assembly elections from today )