
नाशिक : आदिवासी (पेसा) क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला खरा. मात्र, सेवानिवृत्त शिक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्याने शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवरील स्थानिक पेसामधील गुणवत्ताधारक उमेदवारांतून भरती प्रक्रीया सुरू केली आहे. रिक्त असलेल्या ६६० जागांसाठी पहिल्याचं दिवशी सोमवारी (ता.९) १७५ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. अर्जासाठी ११ सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. (Applications of pesa bharti 175 candidates were received on first day )