
नाशिक : शहरात असमान पाणीपुरवठा होत असल्याने त्याअनुषंगाने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. महापालिका मुख्यालयावर मोठ्या प्रमाणात आंदोलनेदेखील धडकत असल्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिल्या. त्याअनुषंगाने समस्या सोडविण्यासाठी अभियंत्यांकडे पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सोडविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नागरिकांना थेट अभियंत्यांची संपर्क साधून पाणीपुरवठा संदर्भातील तक्रारींचे निवारण करता येणार आहे. (appointment of department wise engineers will be redressal of complaints are directly contacted )