
नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पेपरफुटी प्रकरणाची दखल घेताना, भविष्यात गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातर्फे प्रक्रियेत बदल केला आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर तिसऱ्या टप्प्यातील हिवाळी सत्र परीक्षेत तृतीय वर्ष एमबीबीएस व अंतिम वर्ष एमबीबीएस अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन प्रणालीद्वारे परीक्षा केंद्रावर पेपर सुरू होण्यापूर्वी पाठविल्या जातील, असे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शनिवार (ता. १८) पासून तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा सुरू होत आहेत.