नाशिक- पंचवटीतील खैरे मळ्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या चार बांगलादेशी महिला या सुरतवरून मुंबईमार्गे नाशिकमध्ये आल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. संशयित बांगलादेशी महिलांसह एका न्यायालयाने बुधवारपर्यंत (ता. २३) पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित बांगलादेशी महिलांना बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्यांचा पोलिस शोध घेण्यासाठी पथके सुरतच्या दिशेने रवाना झाली आहेत.