
नाशिक : मार्च महिन्यात कुसुमाग्रज स्मारकात दोन दिवसीय हास्यरंग साहित्य संमेलनाची सुंदर आठवण रसिकांची मनात कोरली गेली यात शंका नाही. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ भाष्यकवी रामदास फुटाणे तर उद्घाटक म्हणून लेखक, दिग्दर्शक सचिन गोस्वामी होते. काहीशी मरगळ आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना या हास्यरंग साहित्य संमेलनाने नवीन उभारी दिली. त्याचबरोबर तपोवनात ५५ फूट उंचीची धर्नुधारी प्रभू श्रीरामाची पूर्णाकृती मूर्तीचे शिल्प तर, मुंबई नाका परिसरात १८ फूट उंचीचे फुले दांपत्याचे अर्धाकृती शिल्पाने शहराच्या सौंदर्यात भर घातली.