
नाशिक : विधानसभा निवडणुकीत लढण्याची प्रबळ इच्छा असताना केवळ जागावाटपाच्या ‘फॉर्म्युल्या’त सहकारी पक्षाला जागा सुटल्याने नाशिक जिल्ह्यात महायुतीसह महाविकास आघाडीत उदंड बंडखोरी झाली. माजी खासदार समीर भुजबळ यांनी पहिली बंडखोरी करत नांदगावमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे दुखावलेल्या शिवसेनेने दिंडोरी व देवळालीतील उमेदवारांना शेवटच्या क्षणी ‘एबी फॉर्म’ देऊन रिंगणात उतरविले आहे. (As cooperative party lost its seat there was huge rebellion in district in Maha Vikas Aghadi along with Maha Union )