
नाशिक : निवडणुकीच्या तोंडावर जुने नाशिकमध्ये झालेल्या दंगलीवर पोलिसांनी वेळीच घेतलेल्या ‘ॲक्शन’मुळे २४ तासांत नियंत्रण मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही महिन्यांत तीन दौरे अन् निवडणूक निर्विघ्न पार पडल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पुण्यापाठोपाठ नाशिक एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जचे केंद्र बनले. शहर गुन्हे शाखेने पाळेमुळे खोदून काढत नाशिकसह सोलापुरातील ‘एमडी’चे कारखाने अन् नेटवर्क उद्ध्वस्त केले; परंतु एमडी ड्रग्जची लागण २०२४ मध्येही सुरूच राहिल्याने पोलिसांसमोर नवनवीन रॅकेटचे आव्हान कायम राहिले.